दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित लेख आपल्या सर्व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ति यांच्यासाठी...
महाविद्यालयाची पायरी न चढताही केवळ परीक्षा देवून विद्यार्थ्यांना यशस्वी करणारी शिक्षणपद्धत आता कालबाह्य झाली असून नव्या युगाची क्रेडिट सिस्टिम शिक्षण क्षेत्रात लोकप्रिय ठरू लागली आहे. क्रेडिट सिस्टिमची ही आधुनिक पद्धत आता राज्यातही लागू झाली असून या पद्धतीमुळे नव्या वर्षांत शैक्षणिक क्षेत्र ढवळून निघणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व त्यांच्या कार्यकक्षेतील महाविद्यालयांमध्ये क्रेडिट सिस्टिम लागू करण्याची घोषणा राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये क्रेडिट सिस्टिमची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल.
क्रेडिट सिस्टिम म्हणजे नक्की काय, हा प्रश्न अद्यापही सव सामान्यांना सतावतो आहे. लॉर्ड मेकॉलेने रूजविलेली ब्रिटीशकालीन शिक्षणपद्धत ही केवळ कारकून निर्माण करण्यासाठीच पोषक होती. विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याच्या दृष्टीने ही जुनाट पद्धत ‘आऊटडेटेड’ झाली आहे. क्रमिक पुस्तकांची घोकंपट्टी करून थेट परीक्षा दिली की झाले, हा विचार आता मागे पडतो आहे.
सत्रनिहाय अभ्यासक्रम पद्धत, विषयनिहाय लेखी व अंतर्गत मूल्यमापनाची प्रत्येकी पन्नास टक्के गुणांची परीक्षा, गुणपत्रिकेत टक्केवारींऐवजी श्रेणी पद्धत हे ‘क्रेडिट सिस्टिम’चे खास वैशिष्टय़ आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वर्गात नियमित बसावे लागणार आहे. शिवाय, शिक्षकांनाही वर्गात नियमितपणे येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
वर्गात जो भाग शिकविला आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रकल्प दिले जातील किंवा तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या आधारे विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळणार आहेत. प्रकल्प कार्य व तोंडी परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहून चालणार नाही. किंबहुना ७५ टक्के कमी हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाही बसता येणार नाही. या नव्या पद्धतीमुळे एखाद्या घटकाचे विविध कंगोरे अभ्यासण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. त्यांच्या आकलनशक्तीचा विकास होईल. आणि महत्त्वाचे म्हणजे, संशोधन क्षेत्राकडे, पीएचडी करण्याकडे त्यांचा कल वाढेल.
या नव्या पद्धतीबद्दल विद्यार्थी , शिक्षक व शिक्षणसंस्था यांच्यातच काहीशी गोंधळलेली स्थिती आहे. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी या नव्या पद्धतीबाबत जनजागृती करायला हवी. त्याचे फायदे-तोटे सर्वांच्याच लक्षात आणून द्यायला हवेत. एवढेच नव्हे तर, क्रेडिट सिस्टिमच्या अनुषंगाने वर्गातील मर्यादित विद्याथी संख्या, अभ्यासक्रमाची जुनाट रचना, आधुनिक तंत्रज्ञान आदींचा नव्याने विचार करायला हवा. या नव्या पद्धतीची नव्या वर्षांत किती ठोसपणे अंमलबजावणी होतेय, याकडे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
This blog will support College staff to work on the Digital College Software Framework. College staff needs to work on Digital College software and University website, it will support them to get various reports and formats as well as the various procedures required to be used on SU website.
Saturday, January 1, 2011
Friday, October 1, 2010
विद्यापीठ बदलत आहे...
सिल्याबस पहिजे, परीक्षा फॉर्म पाहिजे, परीक्षेचे हॉलतिकीट पाहिजे. परीक्षेचे हॉलतिकीट वेळेवर मिळणे व परीक्षा देणे हि खूप महत्वाची गोष्ट आहे. मुख्यत्वेकरून याचा त्रास होतो तो फक्त बहिस्त विद्यार्थ्यांना. तर विद्यापीठाने त्यांच्यासाठी खूप चांगली सोय केली आहे. अशा अनेक मागण्यासाठी आपल्याला आपले ई-सुविधा खाते मदत करेल. बहिस्त विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल-टिकिट मिळविन्यासाठी आपले ई-सुविधा अकौंट कार्यान्वित करावे.
यात आपण ज्याप्रमाणे ई-मेल अकौंट काढतो त्याप्रमाणे आपली माहिती भरावयाची आहे. ती माहिती विद्यापीठात असलेल्या माहितीशी (म्हणजे आपण प्रवेश घेताना दिलेल्या माहितीशी) जर जुळली तर आपल्याला आपले नवीन पासवर्ड तयार करता येईल. मुख्यत्वेकरून लक्षात राहील असा पासवर्ड तयार करावा. जर आपल्याला आपले खाते कार्यान्वित करताना अडचण येत असेल तर आपण MKCL च्या कुठल्याही केंद्रात मदत घेऊ शकता. तेथे हे खाते काढण्यास मदत केली जाईल ते देखील मोफत. आपल्याला मिळालेला १६ अंकी PRN चा आपण वापर करू शकता तोच आपला युजर आयडी असेल.
ई-सुविधा खात्यामध्ये एवढेच नाही तर नौकरी विषयक माहिती देखील उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्या लॉगीन मध्ये EASY नावाची एक लिंक उपलब्ध आहे. या लिंक चा आपण वापर करून सध्या घेत असलेल्या कोर्स नुसार आपल्याला कुठल्या नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे आपल्याला जाणून घेता येईल.

Subscribe to:
Posts (Atom)